शनिवारची रात्र, मन अगदी स्वच्छंदपने बागडत होतं, मस्तपैकी गाणी ऐकावी, नको, एखादा छानसा चित्रपट घरीच का होईना पहावा, मग वाटलं, जाऊ दे, घरातच गप्पा मारत बसावं. एकंदर काय करु अन् काय नाही असं वाटत होतं, यातंच शनिवारची रात्र गेली.
रविवार – याची वाट बघण्यात पूर्ण अठवडा जातो, नेहमीप्रमाणे उशिराच उठलो, अजुनही तो येणार या भितीचा मागमुसही नव्हता, पण जसजसा घडीचा काटा पुढे सरकत होता , तसतशी त्याची चाहूल लागत होती, तो येणार या विचारानेच मनात काहुर माजलं होतं. संध्याकाळ झाली आणि त्याचा तो भयाण चेहरा अधिकाधिक स्पष्ट होत गेला.
रात्र झाली आणि…आणि पराभूत झाल्यावर शत्रुपक्षाच्या हाती लागलेल्या सैन्यासारखं मन विषण्ण झालं. स्वतःच्या पायावर उभं राहिल्यापासनं त्याची दहशत सुरू झाली अन् वरचेवर वाढतंच गेली.
शेवटी मनाशी निश्चय केला, त्याला सामोरं जायचं, झगडायचं… कारण………..
सोमवारला सामोरं गेल्याशिवाय रविवार कसा दिसेल.
Vb

Leave a comment