Human Emotions – Join us on this journey to explore the many dimensions of it.

नवराबायको – आयुष्याचे जोडीदार

मराठीत एक म्हण आहे “क्षणाची पत्नी, जन्माची आई” जी या नात्याचं योग्य प्रकारे वर्णन करते.

माणूस कितीही धैर्यवान, मोठा असो, त्याला नेहमीच अशी जागा हवी असते जिथे तो मुक्तपणे आपलं मन मोकळं करू शकेल. एखादी अशी व्यक्ती जी  कठीण काळात आवश्यक ती साथ देईल, आणि सांगेल की “सगळं ठीक होईल”.

लहानपणी आपण ते आपल्या पालकांमध्ये, कुटुंबातील जवळच्या लोकांत शोधतो. मोठं होताना, आपण ते आपल्या मित्रांमध्ये पाहतो.

पण जसजसे आपण मोठे होतो आणि आपल्या जीवनातील गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यात व्यस्त होतो, काही विशिष्ट समस्या असतात, ज्या पालकांकडे किंवा मित्रांकडे जाणं आपल्याला सहजपणे शक्य नसतं.

आपल्याला कोणीतरी हवं असतं ज्यावर आपण विसंबू शकू, कोणीतरी असा ज्याच्यावर आपल्याला ‘अधिकार’ गाजवू शकू, ज्याच्यापाशी तक्रार करू शकू, भांडू आणि रडू शकू, ज्याच्या सान्निध्यात आपल्याला समाधान आणि प्रणयोत्कट आनंद मिळू शकेल.

सुदैवाने देवाने यासाठीच एक सुंदर नातं निर्माण केलं – जोडीदार.

यातून पालक किंवा मित्रांच्या मदतीचा अनादर करण्याचा माझा अजिबात उद्देश नाही, आपल्याला त्यांची नेहमीच गरज असते, पण दुर्दैवाने, पालक आपल्याबरोबर आयुष्यभर राहू शकत नाहीत आणि मित्रांनाही त्यांचे  प्राधान्यक्रम असतात.

मुलं, मोठी झाली की, पक्ष्यांसारखी, आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी उडून जातात.

उरतो तो फक्त आपला जोडीदार. आपण अशा वयात भेटतो जिथे आपण दोघंही उत्साह आणि स्वप्नांनी भारावलेले असतो. आपण रोज जगण्याला अर्थ देण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी झटत असतो.

प्रारंभीच्या रोमँटिक, उत्साही दिवसांनंतर, खऱ्या आयुष्याची कहाणी सुरू होते.

पण प्रत्येकासाठी आणि प्रत्येकवेळी ते सोपं नसतं. त्यात संघर्ष, त्याग, चढ-उतार येतात, एकमेकांची परीक्षा घेणारे प्रसंगदेखील येतात.

जीवनात आनंदाने भरलेल्या आश्चर्यांसोबतच, कठीण काळही येतो, आणि अशा वेळी आपण ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू शकतो, तो म्हणजे आपला जोडीदार.

इतक्या वर्षांच्या जवळीकतेत तिला आपल्याबद्दल सर्व काही समजते, फक्त डोळ्यात बघून ती आपल्या मनात काय चाललंय ते समजून घेते. एका घट्ट मिठीत ती आपले सगळे दु:खं काही काळासाठी का होईना, दूर करते.

तीही आपल्यासोबत रडते, असं नाही की त्यामुळे प्रत्यक्षात प्रश्न सुटतील, पण ती मिठी, त्या क्षणी सोबत असणं, त्या गोष्टींमुळे आपल्याला जगाचा सामना करण्याची ताकद मिळते. ती आपल्या त्या जवळच्या कृतींनी आपल्याला सांगते की ती आपल्यासोबत आहे. संघर्ष दोघांचाही आहे आणि ‘तू एकटा नाहीस’.

‘काय होईल ते होऊ दे, मी तुझ्यासोबत आहे’ ही खात्री हे जगातलं कोणतंही समर्थन असण्यापेक्षा मोठं आहे.

मराठीत एक म्हण आहे “क्षणाची पत्नी, जन्माची आई” जी या नात्याचं योग्य प्रकारे वर्णन करते.

वरती सांगितल्याप्रमाणे, आपण एकमेकांशी भांडतो, आयुष्याच्या प्रवासात तणावाचे अनेक क्षण येतात. पण आपण दोघंही हे जाणतो की हे सगळं तात्पुरतं आहे आणि अंतःकरणातून आपण कधीच वेगळे होत नाही जोपर्यंत मृत्यू आपल्याला वेगळं करत नाही”.


Discover more from Emotionsbyvijay.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Response

  1. […] नवराबायको – आयुष्याचे जोडीदार […]

    Like

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Discover more from Emotionsbyvijay.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading